Ambedkar Jayanti 2026 : लोकसहभागातून साजरी होणार आंबेडकर जयंती

पनवेल महापालिकेतर्फे नियोजन बैठकीत निर्णय
Ambedkar Jayanti 2026
लोकसहभागातून साजरी होणार आंबेडकर जयंतीpudhari photo
Published on
Updated on

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नियोजन बैठकीत उत्सवाच्या सर्व तयारीची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

यावेळी महापौर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीस आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, महानगरपालिका सदस्य हरिष केनी, तुषार पाटील, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Ambedkar Jayanti 2026
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतरचा पक्षाचा पत्रव्यवहार ग्राह्य मानू नका

मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, सुरक्षाव्यवस्था, स्वच्छता व विविध सुविधा याबाबत नियोजनविषयक चर्चा करण्यात आली. मिरवणुकीसाठी रुग्णवाहिका, थंडपाणी, अल्पोपहार, एनर्जी ड्रिंक, सुरक्षा रक्षक, लाईट व्यवस्था आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी परिवहन व्यवस्थापक गावडे यांनी दिली.

यावेळी उपस्थित नागरिकांच्या सूचना घेऊन त्याविषयी चर्चा झाली. महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी यावेळी आपले विचार मांडले तसेच सूचना दिल्या. मुख्य जनसंपर्क अधिकारी राजू पाटोदकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Ambedkar Jayanti 2026
Thane ZP budget : ठाणे जिल्हा परिषदेचा 116.93 कोटींचा अर्थसंकल्प

जयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, चित्ररथ इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये फ्लेक्स, बॅनर व विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट केली जाणार आहे. आंबेडकर भवन ते शिवाजी महाराज पुतळा मार्गावरील दोन्ही बाजूंना लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मिरवणूक नियोजन

जयंतीच्या दिवशी सकाळी 7 वाजता नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एकत्र जमून, पुष्पहार अर्पण केला जाईल. यावेळी पाठपूजा करुन मानवंदना दिली जाईल. यानंतर सकाळी 7.20 वाजता पुतळ्याजवळून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, एम.टी.एन.एल. रोड, संत जगनाडे महाराज चौक, रोहिदास वाडा, टपाल नाका, कर्नाळा सर्कल, भाजी मार्केट, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विरुपाक्ष मंदिर, निल सॉलिटीयर इमारत, शिवाजी चौक या मार्गे नाट्यगृह येथे पोहोचून समाप्त होईल. त्यानंतर नाट्यगृह येथे पुढील कार्यक्रम होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news