Central Railway : मध्य रेल्वे मुंबई-पुणे आणि नागपूर दरम्यान ६ वीकेंड विशेष सेवा चालवणार Pudhari File Photo
रायगड

Central Railway : मध्य रेल्वे मुंबई-पुणे आणि नागपूर दरम्यान ६ वीकेंड विशेष सेवा चालवणार

मध्य रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे दि. ३०.०४.२०२६ रोजी मुंबई आणि हडपसर ते बनारस एकमार्गी विशेष गाड्या चालवणार.

पुढारी वृत्तसेवा

Central Railway to operate 6 weekend special services between Mumbai, Pune, and Nagpur.

रोहे : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्याच्या हंगामात रेल्वे सेवांसाठी प्रवाशांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ६ वीकएंड विशेष सेवा चालवणार आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यान ४ सेवा आणि पुणे आणि नागपूर दरम्यान २ सेवा चालविणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वीकएंड स्पेशल (४ सेवा) गाडी क्रमांक 01021 वीकएंड विशेष दि. ०१.०५.२०२६ आणि दि. ०३.०५.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.

(२ सेवा) गाडी क्रमांक 01022 वीकएंड विशेष दि. ०१.०५.२०२६ आणि दि. ०३.०५.२०२६ रोजी नागपूर येथून २१.४० वाजता सुटेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.५० वाजता पोहोचेल. (२ सेवा) या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त 01022 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे देण्यात आले आहेत.

पुणे नागपूर पुणे वीकएंड विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक 01467 वीकएंड विशेष दि. ०१.०५.२०२६ रोजी पुणे येथून १५.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०८.०५ वाजता पोहोचेल. (१ सेवा) गाडी क्रमांक 01468 वीकएंड विशेष दि. ०३.०५.२०२६ रोजी नागपूर येथून सकाळी ०७.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा) या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वे प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे दि. ३०.०४.२०२६ रोजी मुंबई आणि हडपसर ते बनारस एकमार्गी विशेष गाड्या चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस- बनारस एकमार्गी विशेष गाडी क्रमांक 01051 एकमार्गी विशेष गाडी दि. ३०.०४.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ११.१० वाजता सुटेल आणि बनारस दुसऱ्या दिवशी दुपारी १३.१० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी हे थांबे देण्यात आले आहेत.

हडपसर बनारस एकमार्गी विशेष गाडी क्रमांक 01453 एकमार्गी विशेष गाडी दि. ३०.०४.२०२६ रोजी हडपसर येथून ०७:५० वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी १३:५० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, दौंड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी आणि ज्ञानपूर रोड हे थांबे देण्यात आले आहेत.

वीकएंड विशेष गाडी क्रमांक 01021, 01022, 01467 आणि 01468 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २९.०४.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. एकमार्गी विशेष गाडी क्रमांक 01051 आणि 01453 साठी विशेष शुल्कासह आरक्षण दि. २९.०४.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह आरक्षण यूटीएस (UTS) प्रणालीद्वारे करता येईल.प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन (RailOne) ॲप देखील डाउनलोड करू शकतात.या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry. indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा. असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT