Railway Security Pudhari
रायगड

Railway Security: मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाकडून 1367 दलालांना अटक; 43.67 लाख रुपयांचा अवैध माल जप्त

3 कोटी रुपयांचे हरवलेले सामान मिळविले पर

पुढारी वृत्तसेवा

महादेव सरसंबे

रोहे: मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने दलाली आणि अनधिकृत प्रवेश, अवैध मालाची तस्करी, प्रवाशांची सोय आणि मालमत्तेचे संरक्षण यांसारख्या एकाच वेळी राबवलेल्या मोहिमांमधून प्रवासी सुरक्षा आणि संरक्षणासाठी अनुकरणीय वचनबद्धता दर्शविली आहे.

जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत मध्य रेल्वेमध्ये 1,377 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 1,367 जणांना अटक करण्यात आली, तसेच एकूण 2.87 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

‌‘ऑपरेशन उपलब्ध,‌’ ‌‘ऑपरेशन नारकोस,‌’ ‌‘ऑपरेशन सतर्क,‌’ आणि ‌‘ऑपरेशन अमानत‌’ अंतर्गत तीव्र केलेल्या मोहिमांमुळे मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आले आहेत. आरक्षित तिकीटधारकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) टॉवेल पसरवणे, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि खऱ्या प्रवाशांना अडथळा आणण्याविरुद्ध आपली मोहीम तीव्र केली आहे.

मध्य रेल्वेच्या विभागनिहाय तपशील पहाता मुंबई नोंदविलेली प्रकरणे 998, अटक केलेली व्यक्ती 986, वसूल दंड रक्कम रूपये 1 लाख 84 हजार 600, पुणे नोंदविलेली प्रकरणे 191, अटक केलेली व्यक्ती 183, वसूल दंड रक्कम रूपये 70 हजार 300, भुसावळ नोंदविलेली प्रकरणे 173, अटक केलेली व्यक्ती 173, वसूल दंड रक्कम रूपये 27 हजार 800, नागपूर नोंदविलेली प्रकरणे 17, अटक केलेली व्यक्ती 17, वसूल दंड रक्कम रु 1,700, सोलापूर नोंदविलेली प्रकरणे 8, अटक केलेली व्यक्ती 8, वसूल दंड रक्कम रु 3 हजार असे एकूण नोंदविलेली प्रकरणे 1377, अटक केलेली व्यक्ती 1367 वसूल दंड रक्कम रू 2,87,400 एवढी रक्कम आहे.

अवैध वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वे नेटवर्कच्या गैरवापराबाबत शून्य सहनशीलता दाखवत, आरपीएफ मध्य रेल्वेने ‌‘ऑपरेशन नार्कोस‌’ आणि ‌‘ऑपरेशन सतर्क‌’ अंतर्गत अमली पदार्थ, तंबाखू आणि अवैध दारूवर कारवाई करत मोठे यश नोंदवले आणि 43.67 लाख रुपयांची जप्ती केली. ऑपरेशन नार्कोस अंतर्गत, जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत, गांजाच्या अवैध वाहतुकीची 13 प्रकरणे उघडकीस आणली गेली आणि 21.92 लाख रुपये किमतीचा अवैध माल जप्त करण्यात आला. 10 गुन्हेगारांना अटक करण्यात आली.

विभागणीय तपशील पाहता नागपूर नोंदवलेली प्रकरणे 9, वसूल दंड रक्कम रु 17 लाख 18 हजार 650 अटक केलेल्या व्यक्ती 9, मुंबई नोंदवलेली प्रकरणे 3, वसूल दंड रक्कम रू 4 लाख 48 हजार 900, सोलापूर नोंदवलेली प्रकरणे 1, वसूल दंड रक्कम रुपये 25 हजार, अटक केलेली व्यक्ती 1 असे एकूण नोंदवलेली प्रकरणे 13, वसूल दंड रक्कम रुपये 21 लाख 92 हजार 550, अटक केलेल्या व्यक्ती 10 आहेत.

ऑपरेशन सतर्क अंतर्गत, जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत, आरपीएफने 4 प्रकरणांमध्ये 5.61 लाख रुपये किमतीचे 16 हजार 286 किलो प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले, आणि अवैध दारूविरोधी मोहिमेत 28 प्रकरणे उघडकीस आणून 16.14 लाख रुपये किमतीची 9.45 लाख मिली दारू जप्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT