Indian Railway Pudhari
रायगड

Konkan Railway | मध्य रेल्वेकडून कोकणवासियांना दिलासा, १० अतिरिक्त उन्हाळी गाड्या चालवणार

दरम्यान ८ गाड्या सावंतवाडीसाठी आणि २ गाड्या मडगावसाठी चालवण्यात येणार आहेत

पुढारी वृत्तसेवा

महादेव सरसंबे

रोहे : मुलांना शाळेची उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जात आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात रेल्वे बस खाजगी बसेस यांना गर्दी दिसत असल्यामुळे प्रवाशांना दगड होताना दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे कोकण मार्गावर १० अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. याचा फायदा कोकणवासीयांना होणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. ८ गाड्या सावंतवाडीसाठी आणि २ गाड्या मडगावसाठी चालवण्यात येणार आहेत.

चालवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये पनवेल-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (८ गाड्या) गाडी क्रमांक 01007 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १६.०५.२०२६ ते दिनांक ०६.०६.२०२६ पर्यंत दर शनिवारी पनवेल येथून १८.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01008 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १६.०५.२०२६ ते दिनांक ०६.०६.२०२६ पर्यंत दर शनिवारी सावंतवाडी रोड येथून सकाळी ०७.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १७.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीला पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ हे थांबे देण्यात आले आहेत.

पनवेल- मडगाव विशेष गाड्या (२ सेवा) गाडी क्रमांक 01105 साप्ताहिक विशेष गाडी सोमवार, दिनांक १८.०५.२०२६ रोजी पनवेल येथून सकाळी ०५.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १८.१० वाजता मडगाव येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01106 साप्ताहिक विशेष गाडी रविवार, दिनांक १७.०५.२०२६ रोजी मडगाव येथून दुपारी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

या गाडीला पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक 01007 साठी विशेष शुल्कावर बुकिंग सुरू झाले आहे.आणि गाडी क्रमांक 01105 साठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक १६.०५.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह बुकिंग यूटीएस (UTS) प्रणालीद्वारे करता येईल.प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन (RailOne) ॲप देखील डाउनलोड करू शकतात.या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT