Mumbai Goa Highway Accident Pudhai
रायगड

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; २ गंभीर

उभ्या ट्रेलरला पाठीमागून बलेनाे कारची धडक

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र माने

नागोठणे: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील सुकेळी गावचे हद्दीत जिंदाल कंपनी समोर सोमवार २४ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजताचे सुमारास उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून बलेना कारची धडक बसून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, सोमवार २४ ऑगस्ट रोजी चालक जयदीप दीपक महाडिक हा त्याचे ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीच्या बलेना कार ही मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे चालवीत घेऊन जात असताना पहाटे ५.३० वाजताचे सुमारास जिंदाल कंपनी सुकेळी येथे आलेवेळी त्याचे समोर गोवा बाजूकडे जाणारा टाटा कंपनीचा ट्रेलर यास पाठीमागून ठोकर लागून अपघात झाला आहे.

सदर अपघातामध्ये बलेनो कार वरील चालक जयदीप दीपक महाडिक व डाव्या बाजूला बसलेले स्वप्निल सुरेश साळुंखे वय ३२ वर्ष रा. इंदापूर- माणगाव यांचे डोक्याला, पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र वाकणचे ए.एस.आय. भानुदास म्हात्रे, पोलिस कॉस्टेबल, सत्यवान पिंगळे, मनोहर माळी व राजू पाटील यांच्यासह नागोठणे सहा.पो.नि. रविंद्र पारखे, पो.हवालदार महेश रूईकर, प्रशांत घरत व प्रशांत भोईर, पो. कॉस्टेबल बळी पुट्टेवाड हे तातडीने घटनास्थळी हजर होऊन मदत कार्य सुरू केले. तसेच अपघातातील जखमींना पुढील उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे नेण्यात आले असून त्यांच्यावर प्राथनिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईकडे हलविण्यात आले आहे.

सदरील ठिकाणच्या अपघातातील वाहन रस्त्याचे बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. अपघाताचा पुढील कारवाई सहा. पो. नि. रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT