trains pudhari photo
रायगड

Ashadhi Ekadashi special trains 2026: आषाढी यात्रेनिमित्त ५४ विशेष रेल्वेगाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने ५४ आषाढी विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi special trains 2026

रोहे: पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने ५४ आषाढी विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २२ जुलै ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर आणि मिरज दरम्यान या गाड्या धावतील. या निर्णयामुळे विदर्भासह, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. १ जुलै २०२६ पासून या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

आरक्षित विशेष गाड्यांचे वेळापत्रक व थांबे:

१. नागपूर - मिरज विशेष गाडी (४ फेऱ्या)

गाडी क्र. 01205: २३ आणि २४ जुलै रोजी नागपूर येथून सकाळी ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल.

गाडी क्र. 01206: २४ आणि २५ जुलै रोजी मिरज येथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल.

प्रमुख थांबे: अजनी, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, जत रोड, कवठे महांकाळ, आरग.

२. नवीन अमरावती - पंढरपूर विशेष गाडी (४ फेऱ्या)

गाडी क्र. 01119: २१ आणि २४ जुलै रोजी नवीन अमरावती येथून दुपारी १४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्र. 01120: २२ आणि २५ जुलै रोजी पंढरपूर येथून सायंकाळी १९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवीन अमरावतीला पोहोचेल.

प्रमुख थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

३. खामगाव - पंढरपूर विशेष गाडी (४ फेऱ्या)

गाडी क्र. 01121: २१ आणि २३ जुलै रोजी खामगाव येथून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्र. 01122: २२ आणि २४ जुलै रोजी पंढरपूर येथून पहाटे ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १९.३० वाजता खामगावला पोहोचेल.

प्रमुख थांबे: जालंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

४. लातूर - पंढरपूर विशेष गाडी (८ फेऱ्या)

गाडी क्र. 01101: २४, २७, २८ आणि २९ जुलै रोजी लातूर येथून सकाळी ०७.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्र. 01102: २४, २७, २८ आणि २९ जुलै रोजी पंढरपूर येथून दुपारी १३.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी १९.२० वाजता लातूरला पोहोचेल.

प्रमुख थांबे: हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, येडशी, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी आणि मोडलिंब.

अनारक्षित विशेष गाड्यांचे वेळापत्रक:

५. भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (४ फेऱ्या)

गाडी क्र. 01159: २४ आणि २५ जुलै रोजी भुसावळ येथून दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

गाडी क्र. 01160: २५ आणि २६ जुलै रोजी पंढरपूर येथून रात्री २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १३.०० वाजता भुसावळला पोहोचेल.

६. कोल्हापूर - कुर्डुवाडी अनारक्षित विशेष (१६ फेऱ्या)

गाडी क्र. 01209: २२ ते २९ जुलै दरम्यान कोल्हापूर येथून दररोज सकाळी ०६.१० वाजता सुटेल आणि दुपारी १३.३० वाजता कुर्डुवाडीला पोहोचेल.

गाडी क्र. 01210: २२ ते २९ जुलै दरम्यान कुर्डुवाडी येथून दररोज दुपारी १६.३० वाजता सुटेल आणि रात्री २२.३० वाजता कोल्हापूरला पोहोचेल.

थांबे: हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, आरग, साळगरे, कवठे महांकाळ, ढालगाव, जत रोड, सांगोला, पंढरपूर आणि मोडलिंब.

७. पुणे - मिरज अनारक्षित विशेष (१४ फेऱ्या)

गाडी क्र. 01207: २३ ते २९ जुलै दरम्यान पुणे येथून दररोज सकाळी ०८.४० वाजता सुटेल आणि सायंकाळी १८.४५ वाजता मिरजला पोहोचेल.

गाडी क्र. 01208: २३ ते २९ जुलै दरम्यान मिरज येथून दररोज रात्री १९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.३० वाजता पुण्याला पोहोचेल.

थांबे: हडपसर, उरुळी, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, वासूद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, धालगाव, लंगरपेठ, कवठेमहांकाळ, सलगरे, बेळंकी आणि आरग.

आरक्षण आणि तिकीट बुकिंगची माहिती:

१ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात:

आरक्षित विशेष गाड्यांचे (गाडी क्र. 01205, 01206, 01119, 01120, 01121, 01122, 01101 आणि 01102) बुकिंग १ जुलै २०२६ पासून सर्व संगणकीकृत केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित तिकिटे: अनारक्षित डब्यांची तिकिटे 'युटीयस' प्रणाली किंवा 'रेलवन' ॲपद्वारे बुक करता येतील. यासाठी नेहमीचे सामान्य दर आकारले जातील.

अतिरिक्त गाड्यांची सोय: आषाढी एकादशी दरम्यान प्रवाशांची गर्दी वाढल्यास गरजेनुसार आणखी अतिरिक्त गाड्या सोडण्यात येतील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 'NTES' ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT