Asaram Bapu : उपचारानंतर खोपोलीतून जोधपूरमध्ये रवानगी File Photo
रायगड

Asaram Bapu | आसारामची उपचारानंतर खोपोलीतून जोधपूरमध्ये रवानगी

हृदयरोग, थायरॉईडने त्रस्त; रुग्णालयात घेतले 12 दिवस उपचार

पुढारी वृत्तसेवा

खोपोली : आपल्याच आश्रमातील अल्पवयिन शिष्येवर बलात्कार केल्या प्रकरणी राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळच्या कलोते गावांतील माधवबाग रुग्णालयात गेले बारा दिवस उपचाराकरिता दाखल होता. उपचार पूर्ण झाल्याने तसेच जोधपूर उच्च न्यायालयाने मंजूर केलेली पॅरोल रजा संपूष्टात आलेल्या आसामाम बापूला खोपोली येथून मुंबई विमानतळ व पूढे विमानाने तत्काळ राजस्थान व पूढे जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हृदयरोग,थायरॉईड आदि आजाराने त्रस्त असलेले आसाराम बापू याच्यावर माधवबाग रुग्णालयात गेले बारा दिवस आयुवेदिक उपचार झाल्यानंतर सोमवारी ( आज) त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. सकाळी सात वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांना रुग्णवाहीकेतून मुंबई व पूढे विमानाने जोधपूरला रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान एक महिन्यानंतर पुन्हा तपासणीसाठी आसाराम बापूला माधवबाग रुग्णालयात बोलविले जाणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आसाराम बापू (85) याला सप्टेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. 27 ऑगस्ट रोजी खालापूर तालुक्यातील कलोते येथील माधवबाग आयुर्वेदिक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. आसाराम बापू यांची आरोग्य तपासणी केल्यावर ह्दयरोग, मधुमेह,ब्लाँकेज, हायपर थाईराट असे विविध आजार आढळून आले. त्यामुळे दररोज पंचकर्म,आहार नियोजन,ह्दयरोग विषय उपचार करण्यात आले. आसाराम बापू दोन दिवस प्रवास करून आल्यामुळे त्यांना थकवा होता. परिणामी त्यांच्यावर येथे सहा दिवसा ऐवजी 12 दिवस उपचार करण्यात आले.

राजस्थान उच्च न्यायालयाने 13 ऑगस्ट रोजी आसाराम बापू यांना सात दिवसांची पॅरोल सुटी मंजूर केली होती. पॅरोल अवधी आसाराम बापू राजस्थानमधील लोधी हॉस्पीटल मध्ये दाखल केल्या दिवसांपासून गृहीत धरण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले होत. मात्र तेथील उपचारांनी प्रकृतीत फरक पडत नसल्याने, राजस्थान उच्च न्यायालयास केलेली विनंती न्यायालयाने मान्य केल्यावर आसामार बापू यांची पॅरोल रजा सात दिवसांकरिता वाढवून देण्यात आली आणि 28 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळील कलोते येथील माधवबाग रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. आसाराम बापू माधवबाग रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यापासून सुमारे 150 पोलिसांचा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता.

आसाराम बापूच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्याला आज रुग्णालयातून डिचार्ज देण्यात आला. एक महिन्यात व्यायाम,जेवणाचे नियोजन आणि वेळेवर औषधोपचार घेतल्यावर प्रकृतीची तपासणी करण्यासाठी त्यांना पुन्हा माधवबाग रुग्णालयात यावं लागेल. त्याना सुरुवातीला अर्धा किमीही चालण्याची शक्ती नव्हती त्यामुळे उपचाराकरिता वाढीव दिवस घ्यावे लागले.
- डॉ. राहूल जाधव, माधवबाग आयुर्वेदिक उपचार केंद्र, खोपोली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT