Alibag Panvel ST service (Pudhari Photo)
रायगड

Alibag News | जलवाहतूक बंद झाल्याने एसटीवर भार वाढला

ST bus Frequency Increased | अलिबाग आगारातून अलिबाग-पनवेल विना थांबा सेवेच्या फेर्‍यांमध्ये वाढ

पुढारी वृत्तसेवा

Alibag Panvel Non-Stop Bus

अलिबाग : मे महिन्यातील अवकाळी जलवाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. 25 जून नंतर ती पावसामुळे बंद होते यावर्षी अवकाळी पावसामुळे (लाँच) जलवाहतूक सेवा लवकरच बंद झाल्याचा भार एसटी महामंडळावर पडला आहे. शाळा सुरु होण्यास अजून काही दिवस असल्याने पर्यटक रायगडात येत आहेत. खाजगी वाहने असते तरी एसटी मधूनहि प्रवास करणारे पर्यटक आहेत. जलवाहतूक बंद झाल्याने तसेच पनवेल पर्यंत रेल्वे ची सुविधा असल्याने ये मार्गे प्रवास करणारे प्रवासी जास्त असतात. येथून थेट विनाथांबा अलिबाग पर्यंत येत येते. त्यामुळे एसटी प्रवाश्यांचा भार वाढला आहे. यासाठी अलिबाग आगारातून थेट पनवेलपर्यंत विना थांबा सेवेवर भर देण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी दिली.

उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी यावर्षी पर्यटकांनी रायगडला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शविली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळी पर्यटक दाखल झाले. अलिबागसह वरसोली, काशीद, मुरूड, श्रीवर्धन अशा अनेक समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद पर्यटकांनी लुटला. सागरी क्रिडा बरोबरच उंट, घोडागाडी सवारीचा आंनद पर्यटकांनी घेतला. काही पर्यटकांनी आठ ते पंधरा दिवसासाठी एखादे घर घेऊन त्याच ठिकाणी राहून सुट्टी घालवली. मुंबई, पुणेच्या धावपळीच्या जगतातून मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यटक यावर्षी देखील रायगड जिल्हयात मोठ्या संख्येने आले होते. उन्हाळी सुट्टी संपण्याच्या वाटेवर आहे. पर्यटकांनी आता परतीचा मार्ग स्विकारला आहे.

पर्यटक मुंबई, पुणेकडे रवाना होऊ लागले आहेत. मात्र यावर्षी अवकाळी पावसाबरोबरच जून महिना सुरू झाल्याने जलवाहतूक सेवा बंद झाली आहे. रेवस येथून भाऊचा धक्का, मांडवा येथून गेट वे पर्यंतची जलवाहतूक सेवा गेल्या पंधरा दिवसापासूनच बंद झाली आहे. त्यामुळे अलिबागमधून मुंबईकडे जाणार्‍या पर्यटकांसह प्रवाशांना एसटी बसचा आधार घ्यावा लागला आहे. मुंबई, ठाणे, बोरीवलीकडे जाणार्‍या प्रवाशांसह पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून अलिबाग एसटी बस आगारातून गाड्यांचे नियोजन केले आहे. अलिबाग एसटी बस आगारातून थेट पनवेलपर्यंत विना थांबा एसटीच्या 80 फेर्‍या चालू आहेत. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अलिबाग आगारातून पनवेलपर्यंत ज्यादा बारा फेर्‍या सुरु केल्या आहेत. शिवशाही तसेच साधी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांकडून देण्यात आली आहे.

पर्यटकांसह प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून अलिबाग एसटी बस आगारातून अलिबाग -पनवेल विना थांबा सेवेच्या फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. शनिवार व रविवारी गर्दी वाढल्यास तात्काळ बसची व्यवस्था केली जाईल. सध्या 80 फेर्‍या आहेत. त्यात आणखी 12 ज्यादा फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे.
चेतन देवधर, आगार व्यवस्थापक अलिबाग एसटी बस आगार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT