रायगड : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टीक बंदी बंधनकारक करण्यात आली आहे. अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने प्लास्टीक मुक्तीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. आता बाजारात खरेदीला जाताना दहा रुपयांत कापडी पिशवी एका बटणावर मिळणार आहे. नगरपरिषदेच्या वतीने कापडी पिशवी विक्री मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाच ठिकाणी या मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर ओळखले जाते. प्लास्टीकच्या वापरामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना, पर्यावरणाचा समतोलही बिघडला जातो. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने प्लास्टीक बंदी विरोधी मोहीम राबविली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील हॉटेल, दूध उत्पादक व्यावसायिक, भाजी विक्रेते, शू मार्ट आदी दुकानांमध्ये छापे टाकण्यात आले.
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग नगरपरिषदेच्या स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, प्रकाश तांबे, सुमित गायकवाड, मुकादम, आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी पथकाने कारवाई करीत 69 किलो प्लास्टीक जप्त केले. त्यामध्ये प्लास्टीक पिशवीचे प्रमाण अधिक आहे. या कारवाईतून 76 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईने प्लास्टीकचा वापर करणाऱ्यांना दणका देण्यात आला. शहरातील नागरिकांना कापडी पिशवीची सवय राहावी. अलिबाग शहरातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी कापडी पिशवी विक्री मशीनची व्यवस्था नगरपरिषदेच्या मार्फत करण्यात आली आहे. पाच मशीन असून या मशीनच्या एका बटणावर दहा रुपयांत एक पिशवी विकत मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या मशीन लवकरच शहरातील बाजारपेठांसह वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे आता मांसाहार पदार्थांसह भाजी व इतर पदार्थ खरेदी करण्यासाठी प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी शहरामध्ये उपलब्ध होणार आहे.
प्लास्टीक पिशव्यांची समस्या गंभीर
अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर ओळखले जाते. प्लास्टीकच्या वापरामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना, पर्यावरणाचा समतोलही बिघडला जातो. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेने प्लास्टीक बंदी विरोधी मोहीम राबविली आहे. शहरात बाजारपेठांमध्ये बंदी असलेल्या प्लास्टीक पिशव्यांच्या मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
जनजागृती अपुरीच
अलिबाग नगरपरिषद प्लास्टीक पिशबी बंदीसाठी गेली अनेक वर्षे विविध उपाययोजना राबवित आहे. त्याशिवाय बंदी असलेले प्लास्टीक बाळगणे, विक्री आणि वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. प्लास्टीक विरोधात जनजागृती करून नागरिकांचा प्लास्टीक वापराचा कमी होत नाही. त्यामुळे होणार जनजागृती कमीच पडत आहे.