लिबाग जेट्टीवर दहशतवादविरोधी मॉक ड्रिल pudhari photo
रायगड

Alibag Jetty Mock Drill : अलिबाग जेट्टीवर दहशतवादविरोधी मॉक ड्रिल

संशयास्पद बोटीच्या माहितीने सुरक्षा यंत्रणा सतर्क; प्रमुख पथकांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रमेश कांबळे

अलिबाग जेट्टी परिसरात संशयास्पद बोटीतून दहशतवादी विस्फोटके घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ धाव घेत व्यापक मॉक ड्रिल राबविली. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देता यावा आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेण्यात आले.

नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच प्रोबेशनरी डीवायएसपी योगिता कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी तातडीने कारवाई सुरू केली. यामध्ये अलिबाग पोलीस ठाण्याचे सुमारे 20 कर्मचारी, एटीबी शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव व त्यांचे पथक, क्यूआरटी टीम, बीडीडीएस पथक तसेच डॉग स्कॉडचा समावेश होता. सुरक्षा पथकांनी जेट्टी परिसरात पोहोचून तेथील बोटींची सखोल झडती घेतली.

आपत्कालीन प्रतिसादाचा प्रत्यक्ष सराव

तसेच संशयित हालचालींवर नियंत्रण, विस्फोटक शोध मोहीम, नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद याबाबत प्रत्यक्ष सराव करण्यात आला. या मॉक ड्रिलमुळे किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणेची सज्जता तपासण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT