Kolhapur tree management: सीपीआर आवारातील धोकादायक वृक्षांबाबत तत्काळ खबरदारी घ्यावी

महापालिका, रुग्णालय प्रशासनाला पोलिसांची सूचना
Kolhapur tree management
Kolhapur tree management: सीपीआर आवारातील धोकादायक वृक्षांबाबत तत्काळ खबरदारी घ्यावीPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : शासकीय रुग्णालय आवारात संरक्षक भिंत उभारणीसाठी जेसीबी मशिनद्वारे खोदाई झाल्याने चार ते पाच महाकाय वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत. खोलवर रूजलेल्या वृक्षांची मुळे कमजोर झाल्याने कोणत्याही क्षणी पुन्हा धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती व्यक्त करून महापालिका, रुग्णालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अशी सूचना पोलिसांनी मंगळवारी केली.

शासकीय रुग्णालय आवारातील महाकाय वृक्ष मुंबई हायकोर्टच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोरील रस्त्यावर कोसळल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित ठेकेदाराने संरक्षक भिंतीसाठी रस्त्याच्या एका बाजूला वृक्षाजवळ जेसीबी मशिनद्वारे खोदाई करताना संबंधित यंत्रणांची परवानगी घेतली होती का, खबरदारीसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या उद्यान विभागाशी पत्रव्यवहार झाला होता का, उद्यान अधीक्षकांनी खोदाईचे काम थांबविण्याबाबत सूचना दिलेली असतानाही मंगळवारी सकाळी खोदाईचे काम पुन्हा का सुरू करण्यात आले होते, याबाबत पोलिस यंत्रणेकडून माहिती घेण्यात येत आहे.

वरिष्ठाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्यासह पथकाने मंगळवारी दुपारी घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. खोदाईमुळे धोकादायक बनलेल्या वृक्षांचीही पाहणी केली. कोसळलेल्या वृक्षाजवळ चार ते पाच मोठे वृक्ष धोकादायक आहेत, असा त्यांचा निष्कर्ष आहे. पोलिस निरीक्षक कण्हेरकर यांनी महापालिका उद्यान अधीक्षकांसह सीपीआर रुग्णालय प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खात्याशी संपर्क साधला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news