अलिबाग : सुवर्णा दिवेकर
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून रायगड जिल्ह्यातील 5 लाख 48 हजार 620 कुटुंबापैकी 4 लाख 98 हजार 628 कुटुंबाना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या कुटुंबियांना नळद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यातील सुमारे 50 हजार कुटुंब नळजोडणीपासून वंचित आहेत.
15 तालुक्यांपैकी विशेष म्हणजे 3 तालुके खालापूर म्हसळा आणि उरण ह्या तीन तालुक्यात 100 टक्के नळ जोडणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 91 टक्के कुटुंबियांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक घरात नळ द्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात ज्या घरामध्ये नळ कनेक्शन आहे त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली . त्यानंतर दुसर्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात आले.
आतापर्यंत जिल्ह्यात 91 टक्के कुटुंबियांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. जिल्ह्यात जलजीवन योजना यशस्वी कारण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधिर वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबविली जात आहे.
नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांना त्रास कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार मार्फत जलजीवन मिशन हि योजना राबविण्यात येत आहे. जल जीवन योजने मध्ये प्रतिदिन प्रतिमाणशी 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता अपेक्षित आहे.