Action taken against five boats engaged in illegal fishing during the ban period np88
उरण : राजकुमार भगत
पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणार्या पाच बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मागील सात दिवसांत उरण, मुंबई, रायगड समुद्रात करण्यात आली.
1 जून ते 31 जुलै दरम्यान समुद्रात मासेमारीसाठी बंदी घातली आहे. असे असतानाही जय गौरी नंदन, एकवीरा माता, श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा, देवाची आळंदी आदी बोटी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेल्या होत्या.
समुद्रात मासेमारी सुरू असल्याची माहिती मिळताच मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकार्यांनी कारवाई करून 1 लाख 30 हजारांचा दंड वसूल केला आहे. देशाच्या सुरक्षेत सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.
किमान सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संयुक्त गस्त घालणार्या कोस्टगार्ड, केंद्रीय सुरक्षा बल, सागरी पोलिसांनी बंदी काळातही अवैधरीत्या मासेमारी करणार्या मच्छीमार बोटींची तपासणी करून कठोरपणे कारवाई करण्याची अपेक्षा आहे. मात्र, संयुक्त गस्ती पथक पुढाकार घेताना दिसत नाही.