पनवेल, पुढारी वृत्तसेवा : कोइंबतूर हिसार एक्सप्रेसच्या रेल्वे डब्ब्याला लागली आग..!ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या कोइंबतूर हिसार एक्सप्रेसच्या रेल्वे डब्ब्याला आग लागल्याने प्रवासी भयभीत झाले होते. ही घटना आज (दि.२२) दुपारी घडली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या डब्याला आग लागल्याचे सांगितले जात आहे.
या रेल्वेच्या डब्यात तीन दुचाकी आणि सामान्याच्या गोण्या असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. ही आग लागल्या नंतर प्रवाशी डबे तत्काळ वेगळे करण्यात आले. आग लागलेला शेवटचा डबा आणि अन्य एक बोगी घटनास्थळी उभी होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.