खोपोली : पेण-खोपोली मार्गावरील डोणवतजवळ महिलेची ओढणी चाकात सापडून दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. हा अपघात सोमवारी (27 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
सागर सुरेश वाघमारे हे आपल्या पत्नीसह 3 महिन्याच्या मुलाला घेऊन करोडी आदिवासीवाडी, वरसई पेण येथून इसांबे येथे दुचाकीवरून निघाले होते. ते डोणवत जवळ आले असताना त्यांच्या पत्नीची ड्रेसची ओढणी दुचाकीच्या मागील चाकामध्ये गुंतून दुचाकीचा अपघात झाला. त्यात पती, पत्नी बाळासह खाली पडून अपघात झाला.
या अपघातात 3 महिन्याच्या प्रियांश सागर वाघमारे या लहानग्याच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या अपघाताची नोंद खालापूर पोलिसात करण्यात आली आहे.