पुणे

हुमणी भुंगेरे नियंत्रणासाठी सोलर ट्रॅप वापरा

अमृता चौगुले

महाळुंगे पडवळ, पुढारी वृत्तसेवा: हुमणी भुंगेरे नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही तेथे सोलर ट्रॅप वापरता येतो. हुमणी किडीचा प्रादुर्भावही कमी करता येतो. शेतकर्‍यांनी सोलर लाईट ट्रॅपचा अधिकाधिक वापर करावा, असे मत कृषी सहाय्यक अधिकारी अशोक बाळसराफ यांनी व्यक्त केले.

नांदूर (ता.आंबेगाव) येथील प्रयोगशील शेतकरी सागर ज्ञानेश्वर चिखले यांच्या शेतावर तालुका कृषी अधिकारी टी.के. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलर लाइट ट्रॅपचे प्रात्यक्षिक झाले. यावेळी बाळसराफ बोलत होते. कृषी सहाय्यक पी.बी. उगले, अमोल खमसे, नागेश मोहरे व शेतकरी उपस्थित होते.

सोलर लाईट ट्रॅपचे सहज उपलब्ध होतो. हुमणीमुळे ऊस व इतर पिकांच्या उत्पादनात 40 टक्क्याहून अधिक घट येते. महागडी औषधे वापरूनही हुमणी नियंत्रणात येत नाही, म्हणून सापळा लावावा, असे बाळसराफ यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT