पुणे

सिंहगडावर ९० पोटी प्लास्टिक कचरा

अमृता चौगुले

किरकटवाडी : पुढारी वृत्तसेवा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे वनविभागाच्या वतीने शनिवारी किल्ले सिंहगड व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सामाजिक संस्था व दुर्गप्रेमींचे सहभागातून वनविभागाचे अखत्यारीत असलेल्या टेकड्या व पर्यटनस्थळांच्या स्वच्छतेची मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पर्यावरण रक्षणासाठी अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा राबविण्याची वनविभागाची अभिनव संकल्पना असल्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले. या मोहिमेत 90 बॅग कचरा गोळा झाला.

किल्ले सिंहगड येथील स्वच्छता मोहिमेसाठी सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. यात कष्टकरी पंचायत व बालहक्क कृती समिती, पुणे, मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे, दुर्ग प्रेमी गिरीभवन संस्था, पुणे, रयत शांतिदूत संस्था, मुंबई व वन्यजीव संरक्षण व संवर्धन संस्था, पुणे आदी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

त्याचबरोबर वनविभागाच्या दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेला घेरा सिंहगडचे उपसरपंच गणेश गोफणे, वनपाल बाबासाहेब लटके, पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता जोरकर, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, सुनील पिसाळ, प्रशांत भोसले, माऊली कोडीतकर, संदीप कोळी आदी सहभागी झाले

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT