मंचर : पुढारी वृत्तसेवा: पुणे-नाशिक हमरस्त्यावर मंचर येथे अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणार्या टेम्पोवर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून, टेम्पो व 5 लाख 27 हजार 920 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. टेम्पोतून (एमएच 14 जेएल 5606) अवैधरीत्या गुटका वाहतूक होणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक सतीश होडगर, जवान एम. बी. लोखंडे, जी. डी. येळवंडे यांनी मंचर एस. टी. स्थानकासमोर कारवाई केली.
त्या वेळी टेम्पोचालक उतरून पळून गेला. याप्रकरणी वाहनमालक सागर काळुराम पडवळ (वय 29 , रा. भोरदरा पो. आंबेठाण, ता. खेड) याने त्याच्या सांगण्यावरून चालकाने गुटखा आणल्याचे कबूल केले. मंचर पोलिस ठाण्याचे जवान सोमनाथ गवारी यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुटखा वाहतूक करणारा टेम्पोचालक गाडी सोडून पळून गेला असून, गाडीमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा