पुणे

सहजपूर रेल्वे पुलासाठी 68 कोटी; आ. राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश

अमृता चौगुले

राहू : पुढारी वृत्तसेवा: दौंडचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या प्रयत्नातून दौंड तालुक्यातील सहजपूर व खामगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलासाठी 68 कोटी 50 लक्ष रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. दौंड तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग व जिल्हा मार्गांवर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असणार्‍या समतल रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे भुयारी मार्ग उभारणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती.

यासाठी दिल्ली येथे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याबाबत नुकतेच रेल्वे मंत्रालयाद्वारे दौंड तालुक्यातील सहजपूर व खामगाव येथे उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. सहजपूर येथील उड्डाणपुलासाठी 34 कोटी 5 लक्ष, तर खामगाव येथील उड्डाणपुलासाठी 34 कोटी 45 लक्ष, अशा एकूण 68 कोटी 50 लक्ष रुपये खर्चाची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव, केडगाव-बोरीपार्धी-दापोडी, वरवंड-कडेठाण-हातवळण, पाटस-कानगाव, नानवीज-गिरीम व लिंगाळी-खोरवडी या सहा रस्त्यांवरील रेल्वे क्रॉसिंगऐवजी भुयारी मार्ग उभारण्यात यावा, यासाठी आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. त्यातील वरवंड-कडेठाण-हातवळण, पाटस-कानगाव व नानवीज-गिरीम या तीन ठिकाणी पुणे सोलापूर रेल्वेमार्गावर रेल्वे भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT