येरवडा : पुढारी वृत्तसेवा: 'निम का पत्ता कडवा है, एकनाथ शिंदे भडवा है!' अशा जोरदार घोषणा देत बंडखोर एकनाथ शिंदेच्या विरोधात आक्रमक निदर्शने करीत, फोटोला जोडे मारत पुतळा जाळण्यात आला. या वेळी बंडखोर आमदारांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने येरवडा येथील बिंदुमाधव ठाकरे चौकात शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या वेळी बोलताना माजी नगरसेवक संजय भोसले म्हणाले, 'खोटे हिंदुत्व सांगत मुख्यमंत्र्यांशी गद्दारी करीत राज्याबाहेर हे आमदार गेले आहेत.
शिवसेनेशी गद्दारी करणार्या आमदारांनी आपले बंड थंड नाही केले, तर महाराष्ट्रात परतल्यानंतर शिवसैनिक बंडखोर आमदारांना ठोकून काढतील, असा इशारादेखील भोसले यांनी या वेळी दिला. या प्रसंगी क्षेत्रप्रमुख संजय भोसले, माजी नगरसेविका श्वेता चव्हाण, माजी नगरसेवक जानू आखाडे, नितीन भुजबळ, संघटक संजय वाल्हेकर, राजू सावंत, अॅड. सतीश मुळीक, यशवंत शिर्के आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
हेही वाचा