पुणे

वडगाव रासाई येथे झाडावर वीज पडली

अमृता चौगुले

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा: वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील श्री सद्गुरू भुजंगनाथ काकडे महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असतानाच अचानक नारळाच्या झाडावर वीज कोसळली. वीज कोसळली त्या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी, ग्रामस्थ व महिला होत्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाल्याने वारकरी मोठ्या संख्येने सामील झाले आहेत. वडगाव रासाईतील मुक्काम संपल्यानंतर भक्तिभावाने प्रस्थान झाले. प्रस्थान होत असतानाच अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. रथाच्या चाकांना हवा भरण्यासाठी पालखी थांबवली असता अचानक विजेचा कडकडाट झाला आणि काही क्षणात वीज झाडावर कोसळली. सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT