पुणे

रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

अमृता चौगुले

पुणे :

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतल. संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं समजत आहे.

भाऊसाहेब नारायण शिंदे ( रा. भेंडा, तालुका नेवासे, जिल्हा : अहमदनगर) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे (रा. हडपसर, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT