पुणे

मुळशी तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त; पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट

अमृता चौगुले

खारावडे, पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यातील मुठा व मोसे खोर्‍यामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे. बहुतांश शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. तसेच ज्यांनी अल्प पावसावर पेरण्या केल्या, त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

तालुक्यातील सर्वच ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परंतु, पाऊसच पडत नसल्याने पेरण्याही रखडल्या
आहेत. तालुक्यातील 70 टक्के शेतकर्‍यांनी भातपेरणी करून दहा ते पंधरा दिवस झाले आहेत. पेरणीनंतर एकदाही पावसाने हजेरी लावली नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस न झाल्यास तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांना दुबार भातपेरणी करावी लागणार आहे.

शेतकर्‍यांचे आभाळाकडे डोळे

जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला, तरी पाऊस न पडल्यामुळे तालुक्यातील बळीराजा अडचणीत सापडला आहे. पेरण्यांना होणारा उशीर व दुबार पेरणीचे संकट टळावे, यासाठी लवकरात लवकर पाऊस पडावा, यासाठी शेतकरीवर्ग आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT