पुणे

मतदार याद्या होणार 23 जूनला प्रसिद्ध

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या 17 ऐवजी 23 जून रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याद्यांवर हरकती आणि सूचना आल्यानंतर 9 जुलै रोजी अंतिम याद्या जाहीर होणार आहेत. राज्यातील 14 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 मे रोजी अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षणाची सोडत झाली.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांनंतर 13 मे रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी 17 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या.

नव्या वेळापत्रकानुसार, 23 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जणार आहे. तर, 23 जून ते 1 जुलै या कालावधीत हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. यानंतर 9 जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT