पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: हवामान बदलाचा परिणाम भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. सर्वच भाज्या महाग झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. लांबलेला पाऊस आणि भाज्यांची होणारी कमी आवक यामुळे भाज्या महाग झाल्या आहेत. त्यामुळे सध्या गृहिणींची भिस्त कडधान्यांवर आहे.
पिंपरी येथील भाजी मंडई आणि मोशी उपबाजार समितीमध्ये कांदा, बटाटा आवक कमी असून देखील दर स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या स्वत असल्यामुळे ग्राहक फळभाज्या खरेदी करत होते. या आठवड्यात फळ भाज्या देखील 4 – 5 रुपयांनी महाग आहेत. फळांना मागणी वाढली नसली तरी भावही स्थिर आहेत.
कांद्याची आवक 327 क्विंटल झाली आहे तर बटाट्याची आवक 297 क्विंटल झाली आहे. लिंबांची आवक 36 क्विंटल आवक झाली आहे. लोणच्याच्या कैर्यांना मागणी असून, किलोमागे 30 ते 40 रुपये एवढा भाव मिळत आहे. टोमॅटोची आवक 289 क्विंटल झाली आहे. काकडीची आवक 138 क्विंटल झाली आहे. 30 ते 35 रुपये किलो काकडीला भाव आहे.
फळांमध्ये फणस, टरबूज, लिची यांना मागणी आहे.
पालेभाज्या दर :
पालक 15
कोथिंबीर 20
मेथी 25-30
शेपू 20
कांदापात 20
पुदिना 10
मुळा 15
फळभाज्यांचे किलोचे भाव :
कांदा 20-25
बटाटा 25-30
लसूण 40 – 45
भेंडी 40 – 45
गवार 60-70
टोमॅटो 30-35
दोडका 35-40
हिरवी मिरची 80
कोल्हापुरी मिरची 100
दुधी भोपळा 20-30
लाल भोपळा 35
पांढरी काकडी 30 – 40
फळांचे नाव दर (किलो) :
कलिंगड 25-30
खरबूज 20-25
पांढरी काकडी 30 – 40
गावरान काकडी 40-50
कारली 40 -50
पडवळ 60
फ्लॉवर 40
कोबी 35
वांगी 30 – 40
भरताची वांगी 30-40
शेवगा 40-50
गाजर 25-30