पुणे

भटक्या कुत्र्यांची नागरिकांमध्ये दहशत; रात्रीच्या वेळी फिरणे झाले अवघड

अमृता चौगुले

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा

नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे रात्री रस्त्यावरून फिरणे अवघड झाले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दर महिन्याला नागरिकयाबाबत तक्रार करतात, पण काहीच कारवाई होत नाही. वडगाव शेरी, खराडी, विमाननगर आणि कल्याणीनगरमध्ये कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पण त्यांची दखल घेतली जात नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार वर्षाला जवळपास दहा हजार नागरिकांना कुत्री चावा घेतात. पालिकेने वर्षात सात ते आठ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, कुत्र्यावर शस्त्रक्रिया केल्यांनतरही त्यांची संख्या वाढत असल्याचा विरोधाभास पाहायला मिळत आहे. अद्याप कित्येक कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे बाकी आहे. यामुळे कुत्र्यांची संख्या वाढतीच आहे.

कुत्र्यांच्या संख्येनुसार शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. त्यासाठी शस्त्रक्रिया करणार्‍या संस्थांची संख्याही वाढविणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांबाबत मोहल्ला कमिटी आणि प्रभाग समितीच्या बैठकीमध्ये वारवांर तक्रार केली जात आहे. मात्र, तरी कुत्रे पकडली जात नाहीत. पालिकेचे अधिकारी तक्रार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT