पुणे

पुणे शहरात नव्या विषाणूंचे आणखी पाच रुग्ण

अमृता चौगुले

पुणे : पुण्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराच्या आणखी पाच रुग्णांचे निदान झाले आहे. 'बीए 5' या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नव्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तेरापर्यंत पोहोचली आहे.

पुणे शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या 'बीए 4' आणि 'बीए 5' या दोन प्रकारच्या विषाणूंचे रुग्ण आढळले होते. पुण्यातील आयसर या प्रयोगशाळेत या रुग्णांच्या चाचण्यांचे जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते. त्या तपासणीमधून 28 मे रोजी पुण्यात नव्या विषाणू प्रकाराचा शिरकाव झाल्याचे अधोरेखित झाले होते.

पुण्यात 265 कोरोनाबाधित
पुणे शहरामध्ये बुधवारी (दि. 22) 265 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. पुण्यात दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असल्याने वारकर्‍यांनी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT