पुणे

पुणे : ‘डब्लूएचओ’तील नोकरीचे आमिष; राज्यातील अनेकजण जाळ्यात अडकल्याचा अंदाज

अनुराधा कोरवी

पुणे, पुढारी वृत्तसेवा ः जागतिक आरोग्य संघटनेत (डब्लूएचओ) जिल्हा व तालुका सुपरवाझरपदी नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणतरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील दहा ते अकरा जणांची अशाप्रकारे फसवणूक
झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ठगवणूकीचे हे जाळे राज्यात पसरले असल्याची देखील शक्यता आहे.

शिवाजीनगर परिसरात ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली थाटलेले कार्‍यालयाचा गाळा गुंडाळून पळ काढला तेव्हा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात शिवशंकर बाहेकर नावाच्या व्यक्‍ती विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्वेनगर येथील एका 26 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. दरम्यान, नोकरीच्या आमिषाने तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या प्रकारांना आळा बसण्याची गरज आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT