पुणे

पिंपरी : ‘वायसीएम’ने निवडला आऊटसोसर्सिंगचा पर्याय, 206 कर्मचारी खासगी संस्थेचे

अमृता चौगुले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने वर्ग तीन व चारमधील एकूण 206 कर्मचारी खासगी एजन्सीमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी वेतनावर दर महिन्यास 55 लाख 39 हजार 661 रूपये खर्च अपेक्षित आहे.

वायसीएम रूग्णालयात पालिकेचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे रूग्णांना सेवा पुरविण्यात अडचणी येत आहेत. तक्रारी वाढल्या होत्या. त्यासाठी पालिकने आऊटसोर्सिंगद्वारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास स्थायी समितीने 1 ऑक्टोबर 2021 ला मंजुरी दिली आहे. त्यासाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून वर्ग तीनमधील 18 लिपिक, 6 कॉम्प्युटर ऑपरेटर, 3 दूरध्वनी चालक, 2 गृह निवस्त्रपाल, 2 आहारतज्ज्ञ, 1 दंत मॅकेनिक, 1 श्रवणमापक तंत्रज्ञ, 3 डायलेसिस तंत्रज्ञ, 3 ईसीची तंत्रज्ञ, 1 ईईजी तंत्रज्ञ, 24 स्टाफनर्स, 5 भूलशास्त्र तंत्रज्ञ, 4 सीएसएसडी तंत्रज्ञ, 6 ऑपरेशन थिएटर सहायक, 6 ऑपरेशन थियटर तंत्रज्ञ, 4 प्लास्टर टेक्निशियन, 1 क्लिनिकल सायकॉलपेगिस्ट, 4 लॅब टेक्निशियन, 1 ऑप्थेमेट्रीस्ट, असे एकूण 99 पद संख्या आहे.

तर, वर्ग चारमधील 7 ब्लड बँक परिचर, 11 प्रयोगशाळा सहायक, 12 मजूर, 10 आणिबाणी प्रभाग सेवक, 16 शिपाई, 2 ड्रेसर, 6 सीएसएसडी सहायक, 30 ऑपरेशन थिएटर परिचर, 13 क्ष-किरण परिचर, असे एकूण 107 पद संख्या आहे. दोन्ही मिळून 206 कर्मचारी असून, त्यांना किनाम वेतन कायद्यानुसार वेतन दिले जाणार आहे. एका महिन्यासाठी सेवाशुल्क धरून वेतनाचा एकूण खर्च 55 लाख 39 हजार 661 इतका आहे. त्या खर्चास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT