पुणे

पिंपरी : भांडणात मध्यस्थी केल्याने मारहाण

अमृता चौगुले

पिंपरी : भांडणात मध्यस्थी केल्याचा राग आल्याने दोघांनी मिळून एकाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) रात्री साडेअकराच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली. याप्रकरणी हेमराज रामदेव चौधरी (37, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी) यांनी बुधवारी (दि .15) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, लवलेश दुबे, दीपक दुबे (दोघे रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या घरासमोर भांडण करीत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली, याचा राग डोक्यात धरून आरोपीने फिर्यादी यांना सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचे कपाळ, छाती आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे.

SCROLL FOR NEXT