पुणे

पिंपरी: प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू; 31 मे 2022 पर्यंत समाविष्ट करणार

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्रिदस्यीय सदस्यीय प्रभागनिहाय मतदार यादी बनविण्याचे काम सुरू आहे. 31 मे 2022 पर्यंतची पुरवणी मतदार यादी प्रभागनिहाय फोडण्याचे काम सुरू आहे. प्रारूप मतदार यादी शुक्रवारी (दि.17) प्रसिद्ध केली जाणार आहे.

शहराच्या एकूण 46 प्रभागरचनेला राज्य निवडणुक आयोगाने 12 मे रोजी अंतिम मंजुरी दिली. त्यानंतर 13 मे रोजी प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. तर, 31 मे रोजी एससी, एसटी व महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले आहेत. त्यासाठी 17 जून ते 7 जुलै असा कार्यक्रम जाहीर केला आहे.

पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर या चार विधानसभा मतदार संघाच्या यादीनुसार 5 जानेवारी 2022 ला जाहीर केलेली मतदार यादीनुसार प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्वीच झाले आहे. निवडणूक आयोगाने आता 31 मे 2022 पर्यंतच्या मतदार यादीनुसार प्रभागनिहाय यादी तयार करा, अशा सूचना दिल्या आहेत. ती पुरवणी यादी आयोगाकडून घेऊन प्रभागनिहाय फोडली जाणार आहे.

त्या संदर्भातील कामकाज बीएलओकडून सध्या सुरू आहे. ते काम गुरूवार (दि.16) पर्यंत म्हणजे सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. दुसर्‍या दिवशी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ती पालिकेच्या संकेतस्थळावरही पाहता येणार आहे. तसेच, पालिकेतील निवडणूक विभागात ती उपलब्ध असणार आहे.

यादीत नाव नसणे, दुसर्या प्रभागाच्या यादीत नाव असणे, मयत मतदाराचे नाव असणे आदीसंर्भात 17 ते 25 जून असे 9 दिवसांच्या कालावधीत संबंधित व्यक्तीस हरकती नोंदविता येणार आहे. अंतिम यादी 7 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे.

नाव असल्याची खातरजमा करावी
राज्य निवडणूक आयोगाची 31 मे 2022 पर्यंतच्या पुरवणी मतदार यादी प्रभागनिहाय फोडून यादी करण्याचे काम सुरू आहे. यादी प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांनी आपले नाव आहे की नाही हे तपासून घ्यावे. नाव नसल्यास संबंधित व्यक्तीकडूनच हरकत स्वीकारू, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

https://youtu.be/7KwsutS10qQ

SCROLL FOR NEXT