पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएल) सन 2021-22 या वर्षातील संचलन तुटीपोटी 16 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध कामांसाठी एकूण 23 कोटी 17 लाख खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.14) मंजुरी दिली.
निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटीएस मार्ग व बस थांब्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी 1 कोटी 12 लाख खर्च आहे. किवळे, रावेत, मामुर्डी येथील पवना नदीलगत सर्व्हे नंबरच्या मोजणीसाठी 18 लाख शुल्क आहे. पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटीची ड्रेनेजलाइन पालिकेच्या लाइनला जोडण्यासाठी 16 लाख 48 हजार खर्च आहे. भोसरीतील पंप हाऊस येथे अतिरिक्त वीजभारासाठी 12 लाख 67 हजार शुल्क आहे. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली.
काळभोरनगर, मोहननगर व इतर परिसरातील ड्रेनेजलाइनमध्ये सुधारणा करणे व उर्वरित ठिकाणी लाइन टाकण्यासाठी 24 लाख आहे. पवना, इंद्रायणी व मुळा या नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी 43 लाख खर्च आहे. जाधववाडी, मोशी येथील अंतर्गत रस्ता रुंदीकरण कामास अडथळा ठरणार्या विद्युत वाहिन्या व खांब हलविण्यासाठी 1 कोटी 15 लाख खर्च आहे. कोरोनाचा वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी व त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी 10 लाख खर्च आहे. त्यास मंजुरी देण्यात आली.
अनधिकृत भंगार, गोदामाची आग विझविण्यासाठी पालिका शुल्क घेणार अनधिकृत भंगार व्यावसायिक, गोदामामध्ये लागलेली आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून सेवाशुल्क आकारणी केली जाणार आहे. अग्निशामक विभागातील कर्मचार्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठ्यक्रमांकरिता धोरण ठरविण्यात येणार आहे. त्याला विधी समितीमध्ये आयुक्त पाटील यांनी मंजुरी दिली.