पिंपरी : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर खुनी हल्ला चढवला. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास काळभोर नगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी विजय किसन अयवळे (33, रा. काळभोर नगर, पिंपरी) यांनी सोमवारी (दि. 13) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, मारुती अभिमान धोत्रे (22, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड), परशुराम म्हेत्रे (वय 21), कृष्णा शिवाजी वारभवन (19, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड), आकाश जाधव (वय 20), तोफिक रजाक शेख (18, रा. राजनगर), जितेंद्र आनंद जाधव (21, संग्राम नगर झोपडपट्टी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी व त्यांच्या दुकानातील कामगार नंदू शर्मा यांच्यावर खुनी हल्ला चढवला.
आरोपींनी फिर्यादी यांच्यासह दोघांना लोखंडी रॉड, लाडकी दांडके, सिमेंटचे गट्टू, कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. तसेच, घातक हत्यारे हवेत फिरून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.