पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
चिंचवड ग्रेड सेपरेटरवरील पादचारी पुलावर जाहिराती चिकटविल्याने पुलाचे विद्रुपीकरण झाले आहे, अशा आशयाचे वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले होते. यांनतर या वृत्ताची दखल घेऊन पुलाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे.
चिंचवड येथे ग्रेड सेप्रेटर पुलाची दुरवस्था झाली होती. पुलावर मोठ्या प्रमाणात जाहिराती चिकटवून पुलाचे विद्रुपीकरण केले होते. तर, दुसरीकडे पुलाच्या पायर्या तुटल्या होत्या व पुलाचा बाहेरील भाग गंजला होता. पूल तयार केल्यापासून पुलाची एकदाही रंगरंगोटी करण्यात आली नव्हती. तसेच, याठिकाणी अनेक वर्षांपासून भिक्षेकरी वास्तव्यास होते.
त्यामुळे पुलावर घाणीचे साम्राज्य पसरले होते. पुलावर विद्युत दिवे नसल्याने पुलावरुन जाताना पादचार्यांना भिती वाटत होती.
सध्या पुलाची डागडुजी, रंगरंगोटी आणि विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. पुलाचे रुपडे पालटल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
हेही वाचा