पुणे

पर्यटक निवासात होणार जागतिक योग दिन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत 21 जूनला महामंडळ परिचलन करीत असलेल्या पर्यटक निवासामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे. आजच्या आधुनिक काळात प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगभरामध्ये योगसाधनेचे, योगाचे पालन करणे आवश्यक आहे.

जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येत असलेल्या सर्व पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास आलेल्या पर्यटकांना एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच पर्यटक निवासात कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचारीवर्गाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

पर्यटक निवासाच्या परिसरातील स्थानिक स्तरावरील योग प्रशिक्षण संस्थेस किंवा व्यक्तीस पर्यटक निवासात बोलवून योगाचे महत्त्व सांगितले जाणार आहे,अ से महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT