खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: 'पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणातील प्रकल्पग्रस्तांना पालिकेच्या नोकरीत राखीव जागा तसेच धरण भागात विकास निधी देण्यात यावा,' अशी मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.
याबाबत पानशेत वरसगाव धरणग्रस्त विकास कृती समितीचे निमंत्रक अमोल पडवळ यांनी पालिकेला निवेदन दिले आहे. ब्रिटिश राजवटीत 1879 मध्ये खडकवासला धरण बांधले. त्यावेळी भूमिपुत्रांना कोणताही मोबदला दिला नाही.
तेव्हापासून खडकवासला धरणाच्या गाळपेर जमिनीत तरकारी पिके घेतली जात होती. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून गाळपेर जमिनीत पाण्याची पातळी वाढवली जात आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचा रोजगार बंद झाला आहे.
पालिकेच्या नोकरी भरतीत पानशेत -वरसगाव धरणातील भूमिपुत्रांसाठी राखीव कोठा, धरणग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पुण्यात वसतिगृह, धरण भागासाठी विकास निधी आदी मागण्या समितीने केल्या