पुणे, पुढारी वृत्तसेवा: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या वतीने कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमधील शंभर गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात केले होते.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन कोथरूड मतदारसंघाचे सरचिटणीस विठ्ठल बराटे यांनी केले. या आरोग्य शिबिरात 150 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी केली.
या वेळी शहर भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, कोथरूडचे अध्यक्ष पुनीत जोशी, संस्थेचे सचिव शास्त्री, प्रभाग अध्यक्ष हेमंत बोरकर, स्वीकृत माजी नगरसेवक बापूसाहेब मेंगडे, सचिव विशाल रामदासी, अजय बराटे, प्रफुल्ल सुभेदार, चंद्रकांत धोत्रे, संदीप खुटाळे, प्रकाश ढोक, संजय दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा