पुणे

डिझेल ग्राहकांची होतेय लूट: 115 रुपये लिटरने विक्री; छावा संघटनेकडून प्रकार उघड

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सततच्या महागाई वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असतानाच पुण्यातील एका पेट्रोलपंपावर चक्क 19 रुपये जादा दर लावून डिझेलची विक्री करीत असल्याचा प्रकार छावा संघटनेने उघडकीस आणला आहे.

याबाबत माहिती देताना छावा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सांगितले, की शिवाजीनगर, पुणे आरटीओ कार्यालयासमोर असणार्‍या शेल पॅट्रोलपंपावर साधे डिझेल 113.25 रु प्रतिलिटर दराने विक्री होत आहे.

सध्या डिझेलचा दर हा 95.36 असा सुरू आहे. तरीही या पेट्रोलपंपावर जादा दराने विक्री केली जात असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणानुसार सध्या डिझेल 95.36 रुपये दर आहे.

शिवाजीनगर येथील पेट्रोलपंपावर जादा दराने दिलेल्या डिझेलच्या दराची पावती.

तरीदेखील पुणे शहरात ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे. शासकीय, तसेच प्रशासकीय पातळीवर या प्रकाराची दखल घेऊन शेल कंपनीवर कारवाई करावी. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी या वेळी दिला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT