पुणे

जम्मू-काश्मीर फेस्टिव्हलमधून संस्कृतीची जपणूक : ठाकूर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय क्रीडा, युवक तसेच माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सरहद संस्थेच्या वतीने 11 ते 15 जून 2022 या काळात पुण्यात होणार्‍या जम्मू-काश्मीर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या.

अनुराग ठाकूर नुकतेच पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडासंकुलाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्या वेळी सरहदचे संजय नहार, महोत्सवाचे संयोजक डॉ. शैलेश पगारिया आणि श्रीपाद ढेकणे यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हे उद्गार काढले.

पुण्यात जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणे, हे कौतुकास्पद आहे आणि त्यातही हा महोत्सव जम्मू-काश्मीरचे पहिले सुपरस्टार के. एल. सहगल आणि संतूरमास्टर पंडित शिवकुमार शर्मा यांना समर्पित केल्याचे ऐकून मला आनंद वाटला.

'सरहद संस्थेच्या वतीने महोत्सवासाठी केवळ काश्मीरशी संबंधित 74 नामांकने आल्याची तसेच ही संस्था जम्मू-काश्मीरमधील युवकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आता चित्रपटासारख्या लोकप्रिय माध्यमाचा वापर करीत असल्याने महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध वृद्धिंगत व्हायला मदत होईल.'असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT