पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाने गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २३) रात्री तळेगाव येथे घडली. आदित्य भेगडे (२७, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आदित्य आणि आरोपी मुलगा हे दोघेही पोलीस रेकॉर्डवरील आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री साडअकराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळीत ते एकमेकांच्या समोर आले. खुन्नस देत पाहण्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी आरोपी मुलाने आदित्यच्या दिशेने गोळीबार केला. खांद्याला गोळी चाटून गेल्याने आदित्य किरकोळ जखमी झाला आहे. घटनेनंतर आरोपी मुलगा पसार झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
हेही वाचा