पुणे

कष्टकर्‍यांच्या मुलीने मिळविले 91 टक्के

अमृता चौगुले

पुणे : हाऊसकीपिंगचे काम करणार्‍या कष्टकर्‍यांच्या मुलीने 91.60 टक्के गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले. तिचे नाव सानिया अकबर शेख. ती पाटील इस्टेट येथे राहते. आई-वडील दोघेही कष्टकरी. मग मोठ्या शाळेत शिकणार कशी? सध्या ती कुंभारवाडा येथील मुबारक गर्ल्स हायस्कूल येथे शिकते.

दहावीच्या परीक्षेत तिला मिळालेले गुण हे तिने रात्रंदिवस केलेल्या कष्टाचे फळ आहे. कोणताही क्लास न लावता सानियाने हे यश मिळविले. लहानपणापासूनच हुशार असलेल्या सानियाला अभ्यासाची प्रचंड आवड. तिला डॉक्टर बनून जनसेवा करायची होती. मात्र, सध्याच्या काळात डॉक्टर होण्यासाठी प्रचंड पैसे ओतावे लागतात. घरची परिस्थिती पाहता हे शक्य नसल्यामुळे सानियाने कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे ठरविले आहे. त्यासाठी ती काम करून शिक्षण घेणार असल्याचे तिने दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

पूना नाईट स्कूलचा निकाल 100 टक्के
पूना नाईट स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 10 वीचा निकाल 100 टक्के लागला असून, यंदा 86 टक्के मिळवून येथून कोमल किरवे हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सरस्वती मंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. वि.वि.आंबेकर यांनी अभिनंदन केले व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT