पुणे

उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी, राज्यपालांच्या दारी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनेक प्रकारचे आंदोलने करून देखील नेट, सेट तसेच पीएच.डी पात्रता धारकांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. पुण्यात सत्याग्रह आणि त्यानंतर थेट राजभवनापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती नेट सेट, पीएच.डी धारक संघर्ष समितीकडून देण्यात आली. पुण्यात शनिवारी (दि.१८) पत्रकार परिषद झाली. समितीचे राज्य समन्वयक डॉ. प्रमोद तांबे, प्रा. सुरेश देवढे, डॉ. विश्वास देशमुख, डॉ. संतोष जाधव, डॉ. प्रवीण गोळे, डॉ. कांचन जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, आता आम्ही निर्वाणीचा उपाय म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, वित्तमंत्री तसेच उच्च अधिकार समिती यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी, अन्यथा अगोदर दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा दहा वर्षातील लेखाजोखा मांडण्यासाठी उच्च शिक्षण कार्यालयासमोर दि.२० नोव्हेंबर पर्यंत सत्याग्रह आणि त्यानंतर त्याच दिवशी राजभवनापर्यंत "उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी राज्यपालांच्या दारी" पदयात्रा काढणार आहोत.

राज्याने उच्च शिक्षणाचा नाद टाकून द्यावा..

राज्याने केवळ बारावीपर्यंतचे शिक्षण द्यावे. राज्याला झेपत नसेल तर त्यांनी उच्च शिक्षण देणे सोडावे, युजीसी बघेल काय निर्णय घेईल. उच्च शिक्षणासाठी मंत्री द्यावा लागतो, अधिकारी नियुक्त करावे लागतात, त्याचीही गरज नसल्याची उद्विग्न प्रतिक्रिया डॉ. तांबे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT