पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याने साखर उद्योगासाठी समान धोरण राबवावे, असे प्रतिपादन हरिभाऊ बागडे यांनी केले. केंद्र सरकारने साखर निर्यात वाढीसह इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट २०२३ पर्यंत १० वरुन २० टक्क्यांपर्यंत नेणार आहे, असेही आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले.
अधिक वाचा –
इथेनॉल क्षमता वाढीसाठी व्याज सवलत योजना देऊन उद्योगासाठी मार्ग काढलेला आहे. त्यामुळे केंद्राचे काम अभिनंदनास पात्र आहे.
राज्य सरकारनेदेखील आपल्या विविध सवलतींसाठी सहकारी आणि खासगी साखर कारखाने असा भेदभाव न करता समसमान धोरण राबवावे. असे आवाहनही विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.
अधिक वाचा-
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते साखर संकुल येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन तथा विस्मा (एनजीओ) सभागृहाचे उद्घाटन झाले.
विस्माचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर, साखर संचालक (अर्थ ) ज्ञानदेव मुकणे, सह संचालक (प्रशासन) राजेश सुरवसे उपस्थित होते.
अधिक वाचा –
राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, विस्माच्या कार्यकारी मंडळातील माधवराव घाटगे, रणजित मुळ्ये, महेश देशमुख, अविनाश जाधव, रामेश्वर नेहरे उपस्थित होते.
साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, साखर उद्योगासाठी यंदाचा हंगाम २०२१-२२ हा आव्हानात्मक आहे. १२.३२ लाख हेक्टरवरील ऊस क्षेत्राच्या गाळपाचे नियोजन केलेले आहे. अतिरिक्त साखर होणार नाही यादृष्टिने कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन प्राधान्याने करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगले यांनी स्वागत तर श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी आभार मानले.
राज्यात यंदाच्या हंगामात सुमारे १५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवले जाईल.
१०६ लाख टनापर्यंत साखर उत्पादन मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न कारखान्यांकडून करण्यात येईल. अशी माहिती विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी यावेळी दिली.
राज्यातील साखर उत्पादनात शंभर खासगी कारखान्यांचा चाळीस टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
साखर निर्यातीमध्येही खासगी कारखाने आघाडीवर आहेत.
साखर उत्पादन, इथेनॉल, सहविज निर्मिती, साखर निर्यात, बायोसीएनजी, सॅनिटायझर व ऑक्सिजन निर्मितीबाबत कारखान्यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचे ते म्हणाले.
अधिक वाचा –