बारामती: मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स बिल्डिंग येथे आज ( रविवार दि. 3): रोजी युवा नेते युगेंद्र पवार यांचा साखरपुडा दुपारी पार पडत आहे. यानिमित्त पवार कुटुंबीय आज पुन्हा एकत्र येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्यानंतर आता बंधू श्रीनिवास पवार यांच्या चिरंजीव युगेंद्र पवार यांचाही आज साखरपुडा पार पडतो आहे. (Latest Pune News)
पवार कुटुंबीयात अनेक वर्षानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. या समारंभाकरिता संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा देखील आज मुंबई येथे साखरपुडा होणार आहे. यावेळी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर पवार उपस्थित असणार आहे.
युवा नेते युगेंद्र श्रीनिवास पवार आणि तनिष्का संजीव कुलकर्णी यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. त्यानिमित्त रविवारी साखरपुडा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.