पुणे

पुणे : तळ्यावर पोहायला गेलेल्या युवकाचा मृत्यू

अमृता चौगुले

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा

पिंपळे खालसा (ता. शिरुर) येथील तळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. इम्रान नजरुद्दिन पठाण असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पिंपळे खालसा येथील इम्रान पठाण व आयान पठाण हे दोघे युवक सोमवारी (दि. १८) दुपारच्या सुमारास येथील तळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. इम्रान हा तळ्यामध्ये गेला; मात्र पुन्हा पाण्यातून वर आलाच नाही. त्यामुळे आयान याने शेजारील शेतात काम करणाऱ्या लोकांना आवाज देऊन घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान शेजारील लोकांनी पाण्यातून इम्रान याला बाहेर काढले.

त्याला शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी इम्रान याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याबाबत नजरुद्दिन ताजुद्दीन पठाण (वय ३६, रा. पिंपळे खालसा, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने तपास करीत

हेही वाचा

SCROLL FOR NEXT