पुणे : पुढारी वृत्तसेवा
चित्रपट पहाण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मैत्रिणीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य करणार्या एका अठरा वर्षीय तरूणाला लष्कर पोलिसांनी अटक केली. बेन अॅक्स बायना (18, रा. एम जी रोड, कॅम्प, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
यासंर्दभात लष्कर पोलीस ठाण्यात पिडित मुलीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार मुलगी आणि आरोपी तरुण हे एकमेकांचे ओळखीचे आहे. आरोपीने तिला चित्रपट पाहण्याकरिता जाऊ असे सांगून तिला दुचाकीवर निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार व अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर तिचे अश्लील चित्रीकरण केले.
त्याने मुलीस बदनामीची धमकी देत संबंधित प्रकार कुठे सांगू नको अशी धमकी दिली. मात्र, तरुणाने मुलीचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मित्रांना दाखवत तिची बदनामी केली. हा प्रकार नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2021 यादरम्यान घडला आहे. याबाबत संबंधीत मुलीला समजल्यानंतर तिने याबाबत लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.