पुणे : तरुणी झोपेत असताना तिच्यावर बलात्कार करून व्हिडीओ चित्रीकरण केले गेले. ते व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून 16 लाख 84 हजार रुपये जबरदस्तीने उकळण्यात आले. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली. (Pune News Update)
तर, माझ्याच घरात शिरून मला मारहाण केली. फोन पे आणि बॅगेतील 1 लाख 27 हजार रुपये जबरदस्तीने घेतले. तसेच घरातील लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेल्याची तक्रार या तरुणाने दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांच्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दोघे आयटी क्षेत्रात काम करीत असून, लिव्ह इनमध्ये राहत होते. 31 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुधीर अर्जुन पाटील (वय 34, रा. रुक्मिणी अपार्टमेंट, आंबेगाव खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीवरील अत्याचाराचा प्रकार 12 ऑगस्ट 2021 रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर पाटील याच्याबरोबर फिर्यादी तरुणी राहत होती. त्या वेळी 12 ऑगस्टला मध्यरात्री एकच्या सुमारास तरुणी झोपली असताना पाटीलने बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर हे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. तेव्हापासून त्याने तरुणीचा वारंवार बलात्कार केला आणि आजपर्यंत 11 लाख 9 हजार रुपये व ऑनलाइन स्वरूपात 5 लाख 75 हजार रुपये रोख स्वरूपात उकळून शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलिस निरीक्षक थोरात करत आहेत.
तर, सुधीर पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तरुणीसह पाच जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. 27 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 यादरम्यान आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॅम्पसमधील शांताई हाइट्स येथे हा प्रकार घडला. ही तरुणी गावाकडील चार जणांना घेऊन सुधीर पाटील याच्या घरात शिरली. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक परदेशी पुढील तपास करीत आहेत.