Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: येरवडा-गांधीनगर प्रभागात १८ वर्षांनंतर काँग्रेसची सत्ता

राजकीय समीकरणे बदलली; नागरिकांनी काँग्रेसला पुन्हा संधी दिली

पुढारी वृत्तसेवा

मुकुंद कदम

येरवडा: प्रभाग सहा येरवडा-गांधीनगरमध्ये काँगेस पक्षाने मागील 18 वर्षांपूर्वी गमावलेली सत्ता पुन्हा खेचून आणण्यात यश मिळवले. प्रभागात एकूण 43 उमेदवार, तर दहा पक्षांनी यंदा निवडणुकीत सहभाग घेतला होता.

मागील 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे तीन उमेदवार संजय भोसले, ॲड. अविनाश साळवे, श्वेता चव्हाण, तर शहरातून एकमेव एमआयएम पक्षाच्या अश्विनी डॅनियल लांडगे निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत प्रभागात बदल झाला आणि काहीसा भाग प्रभाग क्रमांक 13 ला जोडण्यात आला. याचा माजी दोन नगरसेवकांना फटका बसला, यातील एक माजी नगरसेविका श्वेता चव्हाण यांनी आपला मोर्चा प्रभाग तेराकडे वळवला, तर भोसले प्रभाग सहामधून निवडणुकीला सामोरे गेले.

शिवसेनेचे गटनेते पण यंदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळवली आणि आपल्या मर्जीतील इतर तीन उमेदवार रिंगणात उभे केले. यामुळे त्यांच्यावर भाजप कार्यकर्ते नाराज झाले, तर पक्षबदलामुळे शिवसैनिक देखील नाराज झाले. यंदाच्या निवडणुकीत पुण्यातील युती तुटल्याने प्रभागात शिवसेना शिंदे पक्षाकडून चारही उमेदवार उभे केले होते, तर शिवसेना आणि एमआयएम पक्षाचे दोन्ही माजी नगरसेवक यांनी काँग््रेासमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळवली, यातील लांडगे यांनी पद नसतानाही नागरिकांच्या सेवेत कार्यरत असल्याने त्यांची निवड पक्की मानली जात होती आणि त्यांनी विरोधकावर मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर साळवेदेखील विजयी उमेदवार मानले जात होते.

ऐनवेळी जातीच्या मुद्द्‌‍यावरून प्रभागात समीकरणेबदलाचा फायदा सायरा शेख यांना झाला. तर शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आनंद गोयल यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला काही महिन्यांपूर्वीच रामराम करत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे संजय भोसले यांना हारचा सामना करावा लागला, याचा फायदा काँग््रेास उमेदवाराला झाला आणि निवडून आले.

नागरिकांनी दिली पुन्हा संधी

1992 ते 2007 पर्यंत प्रभागात काँग््रेासचे वर्चस्व होते. 2007 साली काँग््रेासला नाकारल्यानंतर तब्बल 18 वर्षांनी काँग््रेासला प्रभागात काम करण्याची संधी नागरिकांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT