Yerwada Garbage Issue Pudhari
पुणे

Yerwada Garbage Issue: येरवड्यात कचऱ्याचा खच; दुकानदार त्रस्त!

कचरा कधी उचलणार आणि दुकान कधी उघडणार? व्यापाऱ्यांची महापालिकेकडे मागणी; परिसरात दररोज साचतोय कचरा

पुढारी वृत्तसेवा

येरवडा : दुकान सकाळी किती वाजता उघडावे... महापालिकेचे कर्मचारी कधी येणार आणि कचरा कधी उचलणार... अशी रोजच सकाळी येरवडा परिसरातील कित्येक दुकानदारांमध्ये चिंताजनक चर्चा पाहायला मिळते. या समस्यांपासून आमची सुटका कधी होणार, अशी विचारणा नागरिक आणि व्यापारी करत आहेत.

येरवडा परिसरात मार्केट आहे, याठिकाणी कपड्याची, भांड्याची, सोन्याची तसेच इतरही सर्व प्रकारची दुकाने आहेत. यातील कित्येक दुकानांसमोर रोज रात्री मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. यावर कोणत्याही नेते मंडळींनी आजवर आवाज उठवल्याचे पाहायला मिळाले नाही. तसेच, कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिक बेधडक कचरा टाकत असल्याचे दिसून येते. येरवडा परिसरातील कचऱ्याच्या समस्येपासून कोण सुटका करून देणार, अशी व्यापारी आणि नागरिकांकडून विचारणा होत आहे.

महापालिका कर्मचारी, नगरसेवक, आयुक्तानाही सांगून झाले, आजवर कोणीच या समस्येकडे लक्ष देत नाही. दुकानांपुढे होणाऱ्या कचऱ्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे. आधीच ऑनलाइन होणाऱ्या खरेदीमुळे व्यापारावर परिणाम होत आहे.
रवी अग्रवाल, व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT