Police Pudhari
पुणे

Yerwada Vehicle Vandalism Arrest: लक्ष्मीनगरमधील वाहन तोडफोड करणाऱ्या गुंडावर पोलिसांचा धिंड

सुलतान रहमान शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले; 22 गुन्ह्यांचा उलगडा, परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा

पुढारी वृत्तसेवा

येरवडा/पुणे: येरवडा यथील लक्ष्मीनगर परिसरात दहशत माजवून गाड्यांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुंडाची शुक्रवारी ( दि. 27) पोलिसांनी धिंड काढली. या कारवाईमुळे वाहन तोडफोडीच्या घटनांना आळा बसला असून, परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पोलिसांनी 22 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.

सुलतान रहमान शेख (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या गुंडाचे नाव आहे. तपासासाठी त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. शेखविरुद्ध यापूर्वी 22 गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत माजवण्यासाठी त्याने लक्ष्मीनगरमधील वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर तो पसार झाला होता. त्याच्या ठावठिकाण्याची माहिती लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

सुलतानने वाहने फोडण्याचे अनेक गुन्हे केले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक रहिवासी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास धजावत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याने जेथे वाहनांची तोडफोड केली होती त्याच लक्ष्मीनगर परिसरातून पोलिसांनी त्याची धिंड काढली. तसेच, त्याच्याविरुद्ध नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT